जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं!! राज ठाकरेंचा भाषणाच्या सुरूवातीलाच सर्वात मोठं वक्तव्य…

मुंबई : मुंबईत आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांचे नाव घेताना देखील सन्मानिय उद्धव ठाकरे असा उल्लेख केला.
राज ठाकरे म्हणाले, खरं तर दोघांची भाषणं संपल्यावर एकत्र आरोळ्या ठोका. इतकंच नाहीतर जे बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमले नाही आम्हा दोघांना एकत्र आणण्याचे ते देवेंद्र फडणवीस यांना जमले, असे राज ठाकरे म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विजयी मेळाव्याच्या भाषणाची दणक्यात सुरूवात केली. यावेळी भाषणातून त्याची नेहमीची बोलण्याची शैली पाहायला मिळाली. आजचा मेळावा शिवतिर्थावर मैदानात व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. पाऊस आहे. त्यामुळे मुंबईत जागा मिळत नाही. बाहेर उभे आहेत. त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असेही राज ठाकरे म्हणाले.
कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असं मी म्हटलं होतं. २० वर्षानंतर उद्धव आणि मी एका मंचावर येत आहोत. असे म्हणाले. दरम्यान, आजच्या मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले असून 20 वर्षांनी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत.
यामुळे येणाऱ्या काळात देखील भाजपसाठी मोठं आव्हान उभे राहणार आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचे हे संकेत आहेत. यामुळे आता यावर भाजप काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.