Weather Update : राज्यात आता ऐन थंडीत पडणार पाऊस! ‘या’ जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट, जाणून घ्या…


Weather Update : राज्यात आज हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर राज्यात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेच १४ आणि १५ तारखेला कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांनपासून थंडी वाढली आहे. वातावरणात बदल झाला असून सकाळी धुके आणि थंडी पडत असून दुपारी ऊन पडतो. काही शहरांत थंडी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळाची स्थिती तयार झाली असून यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. Weather Update

मुंबईत तापमानात घट झाली आहे. मंगळवारी किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. बुधवारीही देखील सकाळी २० अंशाच्या आसपास राहिला. तर गुरुवार ते रविवारी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा तापमानात हळू हळू कमी होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!