Weather Update : राज्यात तापमानात मोठी वाढ! सोलापूरमध्ये पारा 38 अंशावर, यंदाचा उन्हाळा करणार सगळे रेकॉर्ड ब्रेक…

Weather Update : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या अवकाळी पावसामुळे हिरावून घेतला गेला आहे.
अशातच आता राज्यात मागील आठवड्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. आता वातावरण पूर्ववत झाले असून, तापमानाचा पारा वाढू लागला आहे. बुधवारी राज्यात सोलापूर शहराचे तापमान 38.2 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले.
दक्षिण तामिळनाडू ते उत्तर कर्नाटकपर्यंत द्रोणीय क्षेत्र आता दक्षिण तामिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत आहे. असे असले तरी या भागात किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, उर्वरित भागात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मागील तीन ते चार दिवसांपासून कोरड्या हवामानामुळे ऊन हळूहळू तापू लागले आहे. कमाल तापमानाचा पारा 38 अंशांवर पोहोचला आहे. बुधवारी राज्यात सोलापूर शहर जिल्ह्याचे कमाल तापमान 38.2 अंशांवर पोहोचले आहे. Weather Update
दरम्यान, पुणे आणि परिसराचादेखील तापमानाचा पारा 36 अंशांवर आहे. राज्यात कोरडे हवामान राहिल्यामुळे उन्हाचा तडाखा हळूहळू वाढणार आहे. असे असले तरी रात्री आणि पहाटेच्या वेळी थंडी जाणवत आहे.