पुण्यातून कोकणात निघाले, वाटेत काळाने गाठलं, ताम्हणी घाटात ६ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू…


पुणे : पुण्यावरुन कोकणात जाताना रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात थार कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. चक्क ५०० फूट खोल दरीत ही थार कार कोसळली. या अपघातात सहा तरुणांचा मृत्यू झाला असून ते तरुण पुण्यातील रहिवासी आहेत.

अपघाताची माहिती मिळताच येथील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था आणि रेस्क्यू टीमकडून थारमधील इतरांसाठी शोध मोहीम राबविण्यात आली. परवा मंगळवारी रात्री हा अपघात झाला असून नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर आज ही घटना उघडकीस आली.

दरम्यान, २० दिवसांपूर्वीच घेतलेली नवीन थार कार घेऊन हे पर्यटक कोकणात फिरायला निघाले होते. मात्र, या तरुणांवर काळाने घाला घातल्याची ह्रदयद्रावक घटना घडली.

       

साहील साधू गोटे (२४), शिवा अरुण माने (१९), ओंकार सुनील कोळी (१८), महादेव कोळी (१८), प्रथम रावजी चव्हाण (२४), पुनीत सुधाकर शेट्टी (२०) अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत.

पुण्यातील खडकवासला–उत्तम नगर येथील सहा पर्यटक मध्यरात्री कोकण पर्यटनासाठी काल रात्री निघाले होते, त्यावेळी हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे. रायगडच्या माणगाव तालुक्यात ताम्हिणी घाटात काल रात्री थार गाडी पाचशे फूट दरीत कोसळली. या थार कारमधील सहाही तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी या तरुणांचे फोन लागत नव्हते.

त्यानंतर या तरुणांचा शोध सुरु झाला. या तरुणाचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाटात आढळल्याने ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने या तरुणांचा शोध घेण्यास आज सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली.

घटनास्थळी माणगाव पोलीस, SVRSS, शेलार मामा रेस्क्यू टीम आणि RESQ रेस्क्यू पथकाने रोपच्या सहाय्याने खाली उतरून तरुणांचा शोध सुरू केला.रेस्क्यू पथकाने रोपच्या सहाय्याने खाली दरीत उतरुन या तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर यात सहाही तरुणांचा मृ्त्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!