राज्यात पाण्याची कमतरता सुरू, पण मान्सून कुठं आलाय, राज्यात कधी येणार? जाणून घ्या..

पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्याच्या तापमानाने ४० अंशांचा वर पारा गाठला आहे. अनेक ठिकाणी कुठे हिट व्हेवचा ईशारा दिला आहे. त्याचवेळी राज्यात विदर्भात अवकाळ पाऊस आला आहे.
गौतमी ही पाटील नावाची बदनामी करतेय! तिने आडनाव बदलावं; मराठा संघटनेचा थेट इशारा
उन्हामुळे जंगलातील वन्यप्राण्यांची पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. यामुळे आता मान्सून कधी येणार? याची वाट सर्वच जणांकडून पाहिली जात आहे. यासंदर्भात महत्वाची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
चार दिवस उशीर होणार
विषुववृत्तीय अक्षांशांमध्ये दक्षिण हिंद महासागरावर चक्रीवादळ सरकत आहे. हे वादळ कमी होण्यास जवळपास एक आठवडा लागेल. हे वादळ मान्सूनला रोखणारे आहे. परंतु सध्या मान्सून अंदमान निकोबारकडे वेगाने वाटचाल करत आहे.
मान्सूनचे आगमन चार दिवस उशीराने होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. केरळमध्ये 1 जून रोजी दाखल होणारा मान्सून आता 4 जून रोजी दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबईत मान्सून 11 ते 12 जून दरम्यान येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीला मोठा धक्का! गोंदियाच्या नगराध्यक्षांसह 15 नगरसेवक शिंदे गटात
कुठे आहे मान्सून
मान्सून अंदमान-निकोबार बेटावरच रेंगाळला आहे. त्याचा वेगही मंदावला होता. सध्या नैऋत्य वाऱ्यांना गती नसून मौसमी वारे दक्षिण अंदमानच्या समुद्रातच आहे. पुढील दोन दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील विदर्भात मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला. यामुळे अमरावती जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. परिणामी हतनूर धरणाच्या जलसाठ्यात गेल्या चार दिवसांत ३.२५ दलघमी वाढ झाली.
पाण्याच्या टाकीने केला घात! टाकीत पडून उरुळी कांचन येथे दीड वर्षीय मुलाचा मृत्यू
हतनूरच्या इतिहासात पहिल्यांदा मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात जलसाठा घटण्याऐवजी सलग दोन वेळा वाढ झाली. यामुळे पाऊस लांबला तरी धरणातून पाणीपुरवठा अवलंबून असलेली ११० गावे, शहरे व औद्योगिक प्रकल्पांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजेच पंधरा दिवस जास्तीचा दिलासा मिळेल.