Viral Video : विद्यार्थ्यासोबतच्या ‘त्या’ रोमँटिक फोटोशूटवर शिक्षिकेने दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या, ‘आमचं नातं….

Viral Video : शाळेतील शिक्षिकेचं विद्यार्थ्यासोबत व्हायरल रोमँटिक फोटोशूट चांगलच व्हायरल झाले आहे. या आक्षेपार्ह फोटोशूटनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील मुरुगमल्ला गावातील शासकीय शाळेतील हे प्रकरण समोर आलं आहे.शाळेच्या सहलीला गेलेल्या शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत मिठी आणि किस करत केलेलं रोमँटिक फोटोशूट सध्या चर्चेत आहे
महत्त्वाचं म्हणजे फोटोमध्ये दिसणारी ४२ वर्षीय महिला शिक्षिका सरकारी शाळेची मुख्याध्यापिका असून मुलगा दहावी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी आहे. गुरु-शिष्याच्या नात्याला कलंक लावल्याची प्रतिक्रिया या फोटोशूटवर सोशल मीडिया युजर्सने दिली आहे.
हे फोटोशूट व्हायरल झाल्यावर शाळआ प्रशासनाने संबंधित शिक्षिकेचं निलंबन केले आहे. दरम्यान, या फोटोशूटवर शिक्षिकेची प्रतिक्रिया समोर आली आहे. सोशल मीडियावर या कृत्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया संताप व्यक्त केला होता. Viral Video
यावर शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिकेला फोटोशूटबद्दल विचारल्यावर तिने आपल्यामध्ये आई-मुलाचे नाते आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर हे फोटो खासगी असून ते लीक झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सध्या या मुख्याध्यापिकेची निलंबनाची प्रक्रिया सुरु आहे. जोपर्यंत ही प्रक्रिया सुरु आहे तोपर्यंत मुख्याध्यापिकेला माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याची माहिती आहे. दरम्यान, विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं खूप भारी असते.
शाळेला विद्येचे मंदिर म्हटले जाते आणि त्यामध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना गुरु मानलं जातं. मात्र यात शिक्षेच्या मंदिरात शिक्षकांकडून नको ते कृत्य होत असेल तर काय करायचं? असा सवाल अनेकदा पालकांना पडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.