Viral News : प्रेमी युगुलाने बाईकवरच सुरू केले अश्लील चाळे, मग पोलिसांनी दाखवला हिसका, थेट…


Viral News : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका स्टंटमॅनला पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला आहे.

एक व्यक्ति हा धावत्या दुचाकीच्या टाकीवर त्याच्या मैत्रिणीला बसवून तिच्याशी भर रस्त्यात अश्लील चाळे करत होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमांतून या दोघांना अटक करून त्यांना मोठा दंड ठोठावला आहे.

विकासपुरी येथे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी तरुण हेल्मेट न घालता भरधाव वेगाने दुचाकी चालवत असल्याचं दिसत आहे. त्याच्या बाईकच्या टाकीवर पुढे एक तरुणी बसली होती आणि तिनेही हेल्मेट घातले नव्हते.

हा व्हिडिओ दुचाकीच्या मागे बसलेल्या कारचालकाने बनवला आहे. व्हिडिओमध्ये दोघेही बाईकवर अश्लील कृत्य करताना दिसत होते. ही घटना १५ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

दरम्यान, या प्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी स्टंट करणाऱ्या तरुणाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने २४ तासांत पकडून न्यायालयासमोर हजर करत दंड वसूल केला आहे.

अशा परिस्थितीत धोकादायक स्टंट करणाऱ्या तरुणाला जबर शिक्षा सुनावण्यात आली आहे. ११ हजार रुपयांच्या दंडासोबत ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा त्याला सुनावण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!