Viral News : आता अवघडच झालं! साहेब मला थंडीचा त्रास होतोय, मला बायको पाहिजे, तरुणाची पोलिसांकडे अजब मागणी….

Viral News : देशासह राज्याततील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. देशासहराज्यातील अनेक भागात सध्या थंड वाढताना दिसत आहे.
परिस्थिती अशी आहे की घरातून बाहेर पडणं कठीण झाले आहे. लोकांना घरात ब्लॅंकेट घेऊन झोपून राहायला आवडतं. उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये थंडीच्या त्रासामुळे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे.
उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये एका तरुणाने विचित्र तक्रार घेऊन पोलिस स्टेशन गाठले. पोलिस तरुणाची तक्रार वाचून ते आधी हसले आणि नंतर गंभीर झाले. त्याची व्यथा समजून त्याच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून समजावून सांगण्यात आले. यावर कुटुंबीयांनी युक्तिवाद केला. ही बाब उघडकीस आल्यानंतर तो चर्चेचा विषय झाला.
हे प्रकरण अमनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावचं आहे. गावातील रहिवासी नीरजने शनिवारी पोलिस स्टेशन गाठलं. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली, जी वाचून पोलिसही हसले. Viral News
पत्नीसाठी अर्ज. यानंतर लिहिले होते की सर, कृपया मला पत्नी मिळवून द्या. थंडीने त्रास होतोय. तसेच याशिवाय मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांचे म्हणणे पोहोचवण्याची विनंती देखील त्याने केली. त्याचं कुटुंब आणि नातेवाईक त्याचं लग्न करू देत नसल्याचं त्याने सांगितले. त्यामुळे तो नाराज आहे.
जर त्याला पत्नी असेल तर तो आनंदाने जगू शकेल. पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबीयांना बोलावलं. घरच्यांना विचारण्यात आलं की तुम्ही त्याचं लग्न का करत नाही? त्यावर कुटुंबीयांनी तो मानसिक अस्वस्थ असल्याचे सांगितले आहे. सध्या याची चर्चा सगळीकडे सुरू आहे.