येरावड्यातही राडा! कारागृहात दोन टोळ्यांमध्ये जोरदार हाणामारी, १६ कैद्यांवर गुन्हा दाखल…
पुणे : येरवाडा कारागृहात दोन गटात तुफान राडा झाला आहे. वर्चस्व वादातून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी येरवाडा पोलिसांनी १६ कारागृहातील कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्याची पुनरावृत्ती पुन्हा झाल्यामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मेहबूब फरीद शेख ,अनुराग परशुराम कांबळे, शुभम गणपती राठोड, रोहित चंद्रकांत जुजगर, रुपेश प्रकाश आवाडे, विशाल समाधान खरात, आकाश उत्तम शिनगारे, सुरज प्रकाश रणदिवे, किरण रमेश गालफाडे, गणेश वाघमारे, मुकेश सुनील साळुंखे, सचिन शंकर दळवी, विजय चंद्रकांत विरकर, प्रणव अर्जुन रणधीर आणि प्रकाश शांताराम येवले या कारागृहातील कैद्यांमध्ये तुफान राडा झाला आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार, येरवाडा कारागृहात वर्चस्व वादातून कैद्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. या राड्याप्रकरणी पोलिसांकडून येरवडा कारागृहातील १६ कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्कल तीन जवळ असलेल्या बॅरक आठ जवळ कैद्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या घटनेमुळे काही काळ कारागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.