मुख्यमंत्र्यांवरील वादग्रस्त वक्तव्य भोवणार?संजय राऊतांना 100 कोटींच्या मानहानीची नोटीस…!


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, लोकनेते एकनाथ संभाजी शिंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष अमर विनायक लोखंडे यांनी संजय राऊतांना 100 कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस जारी केली आहे.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बदनामीकारक आणि आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करीत मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. आधीच राजकीय संकटात सापडलेल्या ठाकरे गटाच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांसह बंड करीत भाजपासोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटांत जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या होत्या. त्याचवेळी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.

दरम्यान, बंडानंतरही संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदारांवर शेलक्या भाषेत टीका केली होती. त्यानंतर आता शिंदे यांची बदनामी केल्याचा आरोप करीत, अमर लोखंडे यांनी संजय राऊतांना 100 कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!