आत्महत्या करण्याआधी व्हिडिओ केला व्हायरल, म्हणाला मला माफ करा अन् थेट….!!! पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा चालकाने संपवल आयुष्य


पिंपरी चिंचवड : मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या सावकाराला कंटाळून एका रिक्षा चालकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओ तयार करून तरूणानं आत्महत्या केलीय. व्हिडिओमध्ये रिक्षा चालकानं, ‘माझ्या छोट्या मुलीला सांभाळा, माझ्या अंत्यसंस्कारासाठी माझ्या पत्नीकडे पैसे नाहीत.

त्यामुळे मला इलेक्ट्रॉनिक भट्टीमध्ये जाळा’ असं म्हणत त्यानं घरात गळफास घेत आत्महत्या केलीय. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या सावकाराला कंटाळून, एका रिक्षा चालकानं आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.

तरूणानं आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ तयार केला. व्हिडिओमध्ये, मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे. मला माफ करा, असं म्हणत व्हिडिओ तयार केला आणि सोशल माध्यामांमध्ये व्हायरल केला.

राजू नारायण राजभर असं रिक्षा चालकाचे नाव असून, हा तरूण चिंचवड येथील साईनगर भागातील रहिवासी होता. त्यानं घरातच गळफास घेत आत्महत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी रिक्षा चालक राजू नारायण राजभर याने व्हिडिओमध्ये सावकारांची नावं घेतली आहेत.

रजनी सिंग,राजीव कुमार उर्फ गुड्डू भैया, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे या चार सावकाराच्या जाचाला कंटाळून, आत्महत्या करत त्यानं सांगितलं. त्यानं व्हिडिओ तयार केला, सोबतच सुसाईड नोट देखील लिहिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!