२०२४ ला विजय आपलाच होईल असं समजू नका! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य…


मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ पूर्वी भाजप कार्यकर्त्यांना जागे करण्याचा प्रयत्न करताना, पक्षाच्या विजयाबद्दल आत्मसंतुष्ट होऊ नका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुका गांभीर्याने घ्या असा सल्ला दिला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्‍चित आहे, असे समजून मैदानात उतरून काम करणे थांबवू नका, असा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

तसेच भाजपाच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, सर्वसामान्य आणि गरिबांशी संवाद साधा जे भाजपाचे मतदार आहे. आपला विजय निश्चित आहे असा समज करून प्रयत्न करणे सोडू नका. तिकीट कुणाला मिळेल याची चिंता करू नका. भाजपा कार्यकर्त्यांनी गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांवर लक्ष केंद्रीत करा.

याबाबत समाजातील या चार घटकांना नरेंद्र मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ झाला आहे. जातीबाबतचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. परंतु कार्यकर्त्यांनी जातीचा विचार करू नका असं त्यांनी सांगितले आहे. भाजपाच्या या बैठकीत पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांनी सहभाग घेतला होता.

भाजपाने निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून देवेंद्र फडणवीसांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. फडणवीसांची भाषण शैली, राजकीय कौशल्य यामुळे २०२४ च्या निवडणुकीत मतदारांना आकर्षिक करण्यात यश येईल.

मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या कामांबाबत जनतेसमोर फोकस केले जाईल. राज्यातील सर्व जिल्ह्यात फडणवीसांची रॅली होईल. येत्या फेब्रुवारीपासून मिशन महाराष्ट्र ४५ प्लस या अभियानासाठी ते राज्यभरात दौरा करतील आणि दिवसाला ३ सभा घेत लोकांना संबोधित करतील.

राज्यात भाजपा-शिंदे गट-अजित पवार गट यांच्यातील जागावाटप फॉर्म्युला जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. महाराष्ट्रात भाजपा २६ जागांवर निवडणूक लढेल तर शिवसेना शिंदे गट-अजित पवार गट मिळून २२ जागांवर निवडणूक लढेल. राज्यात एकूण ४८ लोकसभा मतदारसंघ आहेत.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!