Vasant More : वसंत मोरेंची आता प्रकाश आंबेडकरांकडे धाव! पुणे लोकसभेसाठी टाकणार नवा डाव…
Vasant More : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काहीच दिवसांपूर्वी मनसेला राम राम ठोकलेले वसंत मोरे अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहे.
वसंत मोरे यांनी आधी महाविकास आघाडीचे नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांना देण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत वसंत मोरे उमेदवारी संदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत आठ उमेदवार हे जाहीर केले आहेत. त्यांनी पुणे लोकसभेसाठी कोणताही उमेदवार घोषित करण्यात आला नाही आहे. त्यामुळे वसंत मोरे हे प्रकाश आंबोडकरांची भेट घेणार आहेत. Vasant More
दोन दिवसांपूर्वी वसंत मोरे हे मराठा समाजाच्या बैठकीत दिसले होते. त्यामुळे ते मराठा समाजाचे उमेदवार असू शकतात, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर मात्र वसंत मोरेंना माध्यमांशी बोलण्यासाठी मराठा समाजाच्या काहींनी हटकलं आणि हेी वागणूक पाहून वसंत मोरे मराठा समाजाच्या बैठकीतून थेट निघून गेले होते.
या प्रकारानंतर ते कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता ते प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन पुणे लोकसभेसाठी इच्छूक असल्याचे सांगू शकतात किंबहूना उमेदवारी मागू शकतात. मात्र त्यांच्या भेटीत नेमकं काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.