Uttarkashi Tunnel Rescue : अनेक अडचणी आल्या, नशिबाने साथही सोडली होती, पण हिम्मत नाही हारली, अशी केली मात..


Uttarkashi Tunnel Rescue  : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये सुरू असलेल्या बचावकार्याला तब्बल १७ दिवसांनी मोठे यश मिळाले आहे. उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या सर्वच्या सर्व ४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

गेल्या १७ दिवसांपासून या बोगद्यात तब्बल ४१ मजूर अडकून पडलेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्या प्रयत्नांना अखेर १७ व्या दिवशीही यश मिळालं. सर्व ४१ मजुरांना प्रत्येकी १ लाख रुपये देणार असल्याची मुख्यमंत्री धामी यांची घोषणा.

12 नोव्हेंबरला उत्तर काशीतील सियालक्यारा बोगद्याचा काही भाग कोसळला आणि तब्बल ४१ मजूर त्यात अडकले. मजुरांसह या बोगद्यात अडकला त्यांच्या कुटुंबीयांचा जीव! हा बोगदा आता ‘मौत का कुँवा’ बनलेला होता. जगण्यासाठी ऑक्सिजन जायलाही जागा नव्हती. Uttarkashi Tunnel Rescue

किती क्षण मृत्यू आणखी लांब आहे, या भयावह मन:स्थितीत असलेले हे मजूर एकमेकांना आवाजावरूनच ओळखत होते. चौफेर अंधार होता. आधी त्यांना बाहेरून ऑक्सिजन पुरविण्यात आला.

नंतर खाणेपिणे… बोगद्यात आडव्या बाजूने ड्रिलिंग, लष्कराला पाचारण, मग व्हर्टिकल ड्रिलिंग, असे अनेक प्रयोग चालले. एक दिवस, दोन दिवस, तीन, चार, अकरा, बारा असे दिवस उलटत गेले आणि सतरा दिवसांनी मृत्यूच्या अंध:कारातून हे ४१ मजूर बाहेर पडले.

सियालक्यारा बोगद्यात ४१८ तासांहून अधिक काळ अडकलेल्या ४१ मजुरांच्या सुटकेसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकासह (एनडीआरएफ) शासनाच्या अन्य यंत्रणांद्वारे बचावकार्य युद्धपातळीवर राबविण्यात आल्यामुळे मजुरांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. बचाव पथकाला यश आले.

दरम्यान, मंगळवारी रात्री ८ वाजता सर्वप्रथम एका मजुराने बोगद्याबाहेर प्रकाश बघितला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ४ मजुरांची सुटका करण्यात यश आले. या मजुरांना तत्काळ रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर तासाभरात उर्वरित ३६मजुरांना बाहेर काढण्यात आले. सर्व ४१ मजुरांना प्रत्येकी १ लाख रुपये देणार असल्याची मुख्यमंत्री धामी यांची घोषणा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!