गौतमीची कार्यक्रमात ‘एन्ट्री’, पण झालं असं की कार्यक्रम रद्द करावा लागला ;पहा नक्की काय झालं….

पुणे : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये तरुण मोठ्या प्रमाणात धिंगाणा करतात. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि तरुणांचा गोंधळ हे समीकरण काही आपल्यासाठी नवीन नाही. गौतमीच्या कार्यक्रमात सतत गोंधळ होतच असतो. त्यामुळे गौतमी सतत चर्चेत असते. अन्नापूर हे शिरूर तालुक्यातील महत्वाचे गाव आहे. या गावाला तमाशा होण्याची परंपरा आहे. मात्र, तमाशाच्या कार्यक्रमात अनेकदा भांडण, राडे होत असतात.
दरम्यान, गौतमी पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अन्नापूर या ठिकाणी कार्यक्रमासाठी आली होती. मात्र गौतमीच्या कार्यक्रमाला तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. हाणामारी देखील मोठ्या प्रमाणात होते. यामुळे गौतमीच्या कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली यामुळे गौतमीचा कार्यक्रम गौतमी येऊन देखील रद्द झाला.
मात्र गौतमी पाटीलच्या ऐवजी तिची सहकारी हिंदवी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यासाठी पोलिसांनी परवानगी देखील दिली. त्यामुळे गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्यांच्या पदरी निराशा आल्याचे पाहायला मिळाले.