Uruli Kanchan : मटका किंग गणेश कांचनच्या मटका जुगार अड्ड्यावर पुन्हा छापा, उरळी कांचन पोलिसांची मोठी कारवाई…


Uruli Kanchan : पुन्हा एकदा गणेश कांचन याच्या तळवडी चौकातील दुसऱ्याही मटका जुगाराच्या अड्ड्यावर उरुळी कांचन पोलिसांनी छापा टाकला आहे.

पोलिसांनी बाजारतळ येथील अजून एका मटका जुगाराच्या अड्ड्यावर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून, सुमारे ७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गणेश शांताराम कांचन (रा.उरूळी कांचन ता.हवेली), दत्ता विठ्ठल कदम (वय.५५ रा.हरीजीवन हॉस्पिटल मागे पीराचा मळा उरूळी कांचन ता.हवेली), स्वप्नील मधुकर जगताप (वय.२५, तांबेवस्ती बायफरोड, उरूळीकांचन ता.हवेली) व किरण प्रकाश भोरे (वय.३२ रा.दातार कॉलोनी,उरूळी कांचन ता.हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुमित नंदकुमार वाघ (वय.३१) यांनी सरकारच्या वतीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुमित वाघ हे पोलीस अंमलदार असून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सुमित वाघ हे उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यांना उरुळी कांचन (ता. हवेली) बाजारतळ येथील ओढ्याच्या कडेला स्वप्नील जगताप व किरण भोरे हे मटका जुगार खेळ घेत आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. Uruli Kanchan

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी शुक्रवारी (ता.१४) दुपारी साडेसहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. तेव्हा स्वप्नील जगताप व किरण भोरे हे ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळ खेळवीत असताना दिसून आले.

पोलिसांनी या कारवाईत मटका जुगार खेळविण्याचे साहित्य व रोख रक्कम, असा ७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तर दुसरीकड, गणेश कांचन याचा, तळवडे चैकातील शैलेजा स्वीट होम शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडच्या खुलेआम मटका जुगार सुरु आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सदर ठिकाणी शुक्रवारी (ता.१४) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. तेव्हा त्या ठिकाणी गणेश कांचन व दत्ता कदम हे कल्याण मटका या नावाचा जुगार खेळ खेळवित असल्याचे दिसून. या कारवाईत पोलिसांनी १३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील व पोलीस हवालदार रमेश भोसले करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!