Uruli kanchan : ग्रामीण भागात बैलगाडा शर्यत अर्थकारणाला चालना देतील, शिंदवणे येथील बैलगाडा शर्यतीत आमदार राहुल कुल यांचे वक्तव्य..
Uruli kanchan : बैलगाडा शर्यतींचे आकर्षण नव्या पिढीला लागणे हे बैलगाडा शर्यतीच्या खेळावरील विश्वास दृड करणारे आहे, ग्रामीण भागात भविष्य काळात बैलगाडा शर्यती अर्थकारणाला चालना देतील, असे मत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले.
श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून दौंडचे आमदार राहुल कुल व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य बैलगाडा शर्यतींचे (ओपन मैदान) ‘आमदार हिंदकेसरी २०२३’चे आयोजन (शिंदवणे ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता.१२) करण्यात आले.
याप्रसंगी बक्षीस वितरण सोहळ्यात बोलताना राहुल कुल यांनी पूर्व हवेलीतील दर्जेदार बैलगाडा शर्यतींच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. यावेळी ते बोलत होते. Uruli kanchan
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट, हवेली बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे, प्रशांत काळभोर, राजाराम कांचन, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, उद्योगपती एल.बी.कुंजीर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन यांच्यासह मोठ्या संख्येने बैलगाडा शौकीन उपस्थित होते.
यावेळी प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्याला बुलेट, द्वितीय विजेत्याला युनिकॉर्न, तृतीय, चतुर्थ विजेत्यांना आकर्षक दुचाकी, तसेच पाच, सहा व सात नंबरच्या विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आले आहे.
या स्पर्धेचे आयोजन शिंदवणे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सचिन मचाले व उद्योजक सागर म्हस्के यांच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी पोपट महाडीक, ओंकार मांढरे, अजित पवार, गणेश मचाले, गुरुनाथ मचाले, शिवाजी महाडीक, बापू खेडेकर, अभिजीत महाडीक, राहुल कड, भिमराव शितोळे , विक्रम महाडीक , शांताराम महाडीक, किरण महाडीक यांच्या वतीने करण्यात आले होते.
दरम्यान, पूर्व हवेली तालुक्यात भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आल्यानंतर बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
विजेते बैलगाडा मालक पुढीलप्रमाणे :-
पहिला क्रमांक – मोहील धुमाळ, दैवत गोवेकर
दुसरा क्रमांक – खानेकार बंधू ,गोठावाडे मूळाशी
तिसरा क्रमांक – सुभाष तात्या मांगडे
चौथा क्रमांक – गौतम भैया काकडे
पाचवा क्रमांक – पिंटू शेठ मोडक
सहावा क्रमांक – नंदू सागडे ,समीर भैया इस्लामपूर.