Uruli Kanchan : उरुळीकांचन येथे स्थानिकाच्या जुगार अड्डावर पोलिसांची कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल..!!

Uruli Kanchan : उरुळीकांचन (ता .हवेली) येथे स्थानिक जुगार अड्डावर पोलिसांची कारवाई करून दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्याकडून जुगार खेळविण्याचे साहित्य व रोख रक्कम आढळून आले आहे. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी (ता.८) रोजी उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या हद्दीत बाजारतळ येथे केली आहे.
गणेश शांताराम कांचन (रा.उरुळीकांचन ता हवेली जि पुणे) सुधीर सुरेश बोंबरे (वय.३४ धंदा मजुरी रा. तुपेवस्ती उरुळीकांचन ता हवेली जि पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावी आहेत.
सविस्तर माहिती अशी की, उरुळी कांचन गावाच्या हद्दीत बाजारतळ येथे ओढयाचे कडेला झाडाचे आडोशाला गणेश कांचन यांच्या सांगणेवरुन सुधीर बोंबरे हे कल्याण नावाचा मटका जुगार खेळविण्याचे साहित्य व रोख रक्कम रुपये चार हजार ६१० रुपये जवळ बाळगुन त्यांच्या ओळखीचे लोकांकडुन पैसे घेवुन कल्याण मटका नावाचा जुगार खेळ खेळवीत असताना पोलिसांना आढळून आले. Uruli Kanchan