Uruli Kanchan : उरुळी कांचन येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीला बेदम मारहाण, गुन्हा दाखल..


Uruli Kanchan उरुळी कांचन : दारूचे व्यसन असलेल्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला शिवीगाळ करून हाताने पायातील बुटाने बेदम मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उरुळी कांचन (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. २९ मार्च) ही घटना घडली आहे.

याप्रकरणी सोमवारी (ता. २२) उरुळी कांचन पोलीस ठाण्यात एका ३१ वर्षीय महिलेने पतीविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार पती अरविंद निवृत्ती धिवार, (रा. उरूळी कांचन, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, अरविंद धिवार याला दारू पिण्याचे व्यसन आहे. शुक्रवारी (ता. २९) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पती अरविंद धिवार याने दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. Uruli Kanchan

यावेळी हाताने व पायातील बुटाने पत्नीच्या पोटात लाथा मारून दुखापत केली. दरम्यान, पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी पती अरविंद धिवार याच्याविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!