Uruli Kanchan : उरुळीकांचन येथे विधवा महिलांसाठी ‘हळदी-कुंकू’ कार्यक्रम! आगळा-वेगळ्या उपक्रमात तहसीलदार सहभागी..!!

Uruli Kanchan उरुळीकांचन : महिला सबलीकरण व सशक्तीकरण यांच्या दृष्टीकोणातून महिलांना एक न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. संसदेत महिलांना पन्नास टक्के प्रतिनिधित्व तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना प्रतिनिधित्व हे महिलांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणार आहे.
महिलांनी सर्व क्षेत्रात आपली कर्तृत्वाची मोहोर उठविली असून महिलांना समाजात मानाचे भक्कम स्थान मिळाल्यास सामाजातील अंधश्रद्धेची घडी दूर होईल असे मत हवेलीच्या अप्पर तहसिलदार तृप्ती कोलते -पाटील यांनी व्यक्त केले.
उरुळीकांचन ( ता.हवेली ) येथील मेमाणे फार्म येथे हवेली पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर यांच्या वतीने आयोजित केलेल्या विधवा महिलांच्या ‘हळदी -कुंकू’ कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून तहसिलदार तृप्ती कोलते पाटील या बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमास मंडल अधिकारी नूरजहाँ सय्यद, गितांजली काळे, तलाठी अर्चना मोरे, उरुळीकांचन च्या माजी उपसरपंच संचिता कांचन, अनिता तुपे, ग्रा.प. सदस्या सायली बडेकर, ग्रा.प.सदस्या स्वप्नीशा कांचन तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. Uruli Kanchan
यावेळी कार्यक्रमात विधवा महिलांना औक्षण करण्यात आले. तसेच त्यांना साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांसाठी मंजुर झालेल्या ४८ रेशनकार्ड वाटप व संजय गांधी निराधार योजनेची मंजूर प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला.