Uruli Kanchan : पुण्याला कॉलेजला जाते म्हणून बावीस वर्षीय तरूणी अचानक बेपत्ता! उरुळीकांचन पोलिस ठाण्यात वडिलांनी दिली बेपत्ता झाल्याची तक्रार…
Uruli Kanchan : पुण्याला काॅलेजला जाते असे सांगुन घरातून बाहेर पडलेली २२ वर्षीय तरुणीने बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात वडिलाने बेपात्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
दिव्या दिलीप तसेवाल (वय. २२, रा. तेज प्लॅटिनम सी. बिल्डींग फलॅट नंबर 101,गडकरीवस्ती उरूळी कांचन ता.हवेली) असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे.
याप्रकरणी वडील दिलीप कचरूसिंग तसेवाल (वय ४९ व्यवसाय – डाॅक्टर, रा. तेज प्लॅटिनम सी. बिल्डींग फलॅट नंबर 101,गडकरीवस्ती उरूळी कांचन ता.हवेली) यांनी मुलगी बेपात्ता झाल्याची तक्रार दिली आहे. Uruli Kanchan
सविस्तर माहिती अशी की, शनिवार (ता.१५) रोजी सकाळी ७. ३० वाजण्याच्या सुमारास सदर मुलगी राहत्या घरातुन पुणे येथे काॅलेजला जाते असे सांगुन घरातुन निघुन गेली. ती नेहमीप्रमाणे उरूळी कांचन रेल्वे स्टेषन येथुन बारामती – पुणे रेल्वेने पुणे येथे काॅलेजला निघुन गेली.
त्यानंतर ती परत सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे झेलम एक्सप्रेसने उरूळी कांचन येथे येणे अपेक्षित होते. परंतु ती उरूळी कांचन येथे आली नाही. सदर मुलीच्या आई- वडिलाने तिला काॅल करून पाहीला परंतु तो बंद लागत होता.
त्यानंतरही तिच्या वडिलांनी उरूळी कांचन रेल्वे स्टेशन येथे जावुन ती दुस-या रेल्वे गाडीने येईल म्हणुन तीची वाट पाहत होते. परंतु ती अदयाप आलेली नाही. तिच्या घरच्यांना काळजी वाटु लागली आहे. त्यांनी उरुळी कांचन पोलिसांनी त्यांच्या मुलीचा शोध घ्यावा. अशी विनंती फिर्यादद्वारे वडील दिलीप तसेवाल यांनी केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.