उरुळी कांचन येथे पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या दोन गटांत मारहाण ; ११ विद्यार्थ्यांवर लोणी काळभोर पोलिसांत गुन्हे दाखल
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता.हवेली ) येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयात इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवण्यावरुन दोन शालेय विद्यार्थ्यांच्या गटांत मंगळवारी (दि.२४) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या मारहाणीत ११हून अधिक विद्यार्थ्यांवर लोणीकाळभोर पोलिसांत गुन्हा दाखल झाले आहे. महाविद्यालयात आवरातच विद्यार्थ्यांनी हत्यारे, हॉकी स्टिक व लोखंडी रॉडने चा वापर करुन एकमेकांवर भिडल्याने चार जण जखमी झाले आहेत.या प्रकरणात दशहत माजविणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घटनास्थवळारून ताब्यात घेतले असून महाविद्यालयात पुन्हा एकदा शालेय विद्यार्थ्यांचा दहशतीचा नंगानाच पहायला मिळाला आहे.
या प्रकरणात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात विद्यार्थ्यांच्या परस्पर तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा अल्पवयीन विद्यार्थ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ११ हून अधिक जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत .तर या प्रकरणी अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्व विद्यार्थी स्थानिक रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयात सकाळी १० वा दोन गटातील विद्यार्थी शालेय आवारात लोखंडी रॉड , हॉकी स्टिक व हत्यारे घेऊन एकमेकांवर भिडले. या मारहाणीत महाविद्यालयात मोठा गोंधळ उडून मारहाणीत ४ जण जखमी झाले आहे. हा मारहाणीचा
प्रकार सुरू असताना ,पोलिसांनी विद्यार्थ्यांची धरपकड केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.या घटनेनंतर हडपसर परिमंडळ ५ चे सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, उपायुक्त विक्रम देशमुख, पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यादींनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याची सविस्तर माहिती घेतली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहे.