Uruli Kanchan : मोठी बातमी! खामगाव टेक अल्पवयीन मुलगी अपहरण प्रकरणी आरोपीला छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या! उरुळीकांचन ग्रामीण पोलिसांचा अचूक तपासाचे फळ..!!

जयदिप जाधव
Uruli Kanchan उरुळीकांचन : गेल्या पाच दिवसापूर्वी अज्ञात आरोपीने फूस लावून खामगाव टेक (ता.हवेली )येथील एका शेतमजूराच्या लेकीला दुचाकीवरुन बसवून अपहरण करणाऱ्या आरोपीला पोलिसांना छत्रपती संभाजीनगरमधून जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. खामगाव टेक परिसरात हा अपहरणकर्ता ऊसतोडणी कामासाठी यापूर्वी या ठिकाणी वास्तव्यास आला असल्याची माहिती पोलिस तपासात स्पष्ट झाली असून आरोपीने मुलीचे अपहरण का केले म्हणून पोलिस तपास सुरू आहे.
अशोक छगन राजपूत (वय ४० ,रा. तांबीगोटा वस्ती, मांजरी , छत्रपती संभाजीनगर )असे अपहरण केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून मुलीसह त्याला ताब्यात घेतले असून अपहरण मुलीची सुखरूपपणे सुटका झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा अशोक राजपूत हा उस तोडणी कामगार म्हणून खामगाव टेक या परिसरात त्याचे वास्तव राहिले आहे. त्याने मुलीच्या अपहरण करण्याचा दृष्टीने तात्पुरती मुलीच्या कुटूंबियाशी सलगी करीत तिला दुचाकीवरुन पळवून नेऊन तिचे अपहरण केले. मात्र प्राप्त परिस्थितीत मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींना या अपहरणकर्त्याची ओळख नसल्याने हे अपहरण कोणी केले म्हणून पोलिसांना अन्यतपासामार्गे आरोपीचा शोध घेण्याचे खडतर आव्हान पोलिसांपुढे होते. आरोपीबद्दल मिळत नसलेली माहिती व अपहरण झालेल्या दुचाकीचा क्रमांत असलेली अस्पष्टतामुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी मोठी कसरत पार पडावी लागली.
दुचाकीचे सर्व डिजीटल नंबर प्रत्येक जिल्ह्याचा क्रमांकाशी जोडताना पोलिसांना अवघड आव्हाने पेलवत दुचाकीचा क्रमांक शोधून आरोपीपर्यंत पोहचण्याची कसब पूर्ण करावी लागली. पोलिसांच्या या प्रयत्नांना यश मिळवून आरोपीचा घरचा पत्ता शोधून आरोपी अशोक राजपूत याच्या मुसक्या आवळता आल्या आहेत.
या गुन्हाचा तपास पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर बारामती अधिक्षक संजय जाधव ,अप्पर पुणे अधिक्षक रमेश चोपडे, दौंड उपविभागीय पोलिस स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळीकांचन पोलिस निरीक्षक शंकर पाटील, प्रभारी निरीक्षण नारायण देशमुख, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नियोजनात करण्यात आला. यावेळी पोलिसांनी ६ स्वतंत्र पथकाची नेमणुक या गुन्ह्याचा तपास कार्यात केली होती.
लेकिच्या सुटकेने बापाचे आनंदआश्रू…
या कुटूंबियातील मुलीचे अपहरण पाच दिवस होऊनही पोलिस तपासात आरोपीचा मार्ग सापडत नसल्याने प्रचंड चितेंत व मानसिक आवस्थेत हे कुटूंब मुलीच्या मिळण्यासाठी आगतिक झाले होते. मात्र उरुळीकांचन पोलिसांनी मुलीच्या कुटूंबियाला दिलेले धैर्य यामुळे हे कुंटूंब मुलगी मिळेलच या आवशेवर वाट पाहत होते. पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांची खाकितील माणुसकी व तपासकार्यातील प्रबळ इच्छाशक्ती आरोपीला गजाआड करुन गेल्याची भावना मुलीच्या वडीलांनी बोलून दाखविली.