Uruli Kanchan : सोरतापवाडी येथे सोरतापेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, शेवटच्या सोमवारी महादेवाचा जयघोष…


Uruli Kanchan उरुळी कांचन : प्रति भिमाशंकर शिवलिंगाचे रुप असलेल्या सोरतापवाडी (ता.हवेली ) येथील सोरतापेश्वराचे शेवटच्या श्रावणी सोमवारनिमीत्त अनेक भाविकांनी दर्शन घेतले आहे. अशी माहिती सोरतापेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष माऊली लाड यांनी दिली.

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या देवस्थानच्या ठिकाणी देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीने भजन , किर्तन व प्रवचन यांसारखे कार्यक्रमांचे आयोजन करुन भाविकांची या ठिकाणी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी रिघ लागलेली असते.

आज (ता.२) शेवटच्या श्रावणी सोमवारच्या दिवशी पहाटे ४ वाजता ग्रामोद्याय बंडोपंत तिखे महाराज यांच्या हस्ते सोरतापेश्वराचा अभिषेक घालण्यात आल्यानंतर भाविकांनी भल्या पहाटेपासुन दर्शनास गर्दी केली होती. पहाटे ५ पासुन रांगा लावुन भाविक दर्शनाचा लाभ घेत होते. Uruli Kanchan

मंदिरात सकाळी ८ वाजता गायत्री होम झाल्यानंतर सकाळी ९ वाजता सोरतापेश्वराची कावड मिरवणुक सवाद्य सोरतापवाडी गावातुन काढण्यात आली होती. या मिरवणुकीत ग्रामस्थांनी सहभाग घेत हर…हर…महादेवाचा जय घोष केला.

देवस्थान समितीच्या वतीने येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद म्हणून खिचडीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच शुद्ध पाणी भाविकांना उपलब्ध करुन देण्यात आले होते.

सायंकाळी ७. ३५ वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सोरतापेश्वराची महाआरती घेण्यात आली. तर रात्री ९ वाजता सचिन माथेफोड महाराज यांचे किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. किर्तनाचा समारोपानंतर अन्नदानाचा महाप्रसादाचा कार्यक्रमात ग्रामस्थ व भाविकांनी लाभ घेतला आहे.

देवस्थानच्या वतीने अध्यक्ष माऊली लाड, उपाध्यक्ष सुनिल चोरघे , विश्वस्त पांडुरंग म्हस्के, सहदेव सावंत, दत्तात्रय चोरघे, छत्रपती गायकवाड, भाऊसाहेब चौधरी, रवी चौधरी, पुजारी अशोक गिरी यांनी परिश्रम घेतले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!