UPSC CSE Result 2023 : UPSC चा निकाल जाहीर, १०१६ उमेदवार होणार अधिकारी, लखनौचा आदित्य श्रीवास्तव देशात पहिला…


UPSC CSE Result 2023 : युपीएससी परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. परीक्षार्थींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सीएसई मेन्स परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

आदित्य श्रीवास्तव देशात पहिला आला आहे. युपीएससी परीक्षेमध्ये टॉप रँकमध्ये मुलांचं वर्चस्व दिसून येत आहे. .युपीएससी सीएसई मेन्स परीक्षा २०२३ मध्ये १०१६ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं आहे.

युपीएससीचा निकाल जाहीर झाला असून परीक्षार्थी upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल तपासू शकतात केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज नागरी सेवा मुख्य निकाल २०२३ जाहीर केला आहे. परीक्षा देणारे इच्छुक अधिकृत वेबसाइटवर गुणवत्ता यादी पाहू शकतात. UPSC CSE Result 2023

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात लखनौच्या आदित्य श्रीवास्तव याने अव्वल क्रमांक (AIR2) पटकावला आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर(AIR 2) अनिमेश प्रधान आहेत, त्यानंतर डोनुरु अनन्या रेड्डी तिसऱ्या स्थानावर आहे. पीके सिद्धार्थ रामकुमार चौथ्या तर रुहानी पाचव्या स्थानावर आहे.

निकाल तपासण्यासाठी हे करा..

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट – upsc.gov.in वर जा.

तुम्हाला वेबसाइटच्या होमपेजवर निकालाची लिंक दिसेल.

निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

तुमच्या समोर एक PDF उघडेल.

तुमचा रोल नंबर पीडीएफमध्ये शोधा.

पीडीएफ डाउनलोड करा आणि निकालाची प्रिंटआउट घ्या…

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!