अवकाळी पावसाने राज्याला झोडपले, काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका, शेतकऱ्यांच मोठं आर्थिक नुकसान….

जळगाव : आज 1 एप्रिल पासून पुढील काही दिवस अवकाळीचे ढग अजून गडद होण्याची शक्यता आहे. तर आगामी काळात एप्रिल ते जून या कालावधीत भारतासह राज्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. एकीकडे उन्हाचा भडका उडाला असताना दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतीय हवामान विभागानं या बाबत महत्वाची माहिती दिली असून या बाबत खबरदारी घेण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे. अकोल्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे.
मुर्तीजापुर तालुक्यातल्या निपाणा गावात देखील अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले. जवळपास 20 मिनिट पाऊस सुरू होता. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू पिकासह कांदा पिकाला फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांपुढे अडचण निर्माण झाली आहे.
तसेच जळगाव जिल्ह्यातही सायंकाळ सुमारास हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे पावसामुळे ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. यामु येणाऱ्या काळात पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात एप्रिल महिन्यात उन्हाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात एप्रिलमध्ये उन्हाळी पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे आंबा पिकाच्या मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.