पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सर्वात मोठा निर्णय..


पहलगाम : काश्मीर येथील पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी मोठा दहशतवादी हल्ला झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली. आता याबाबत केंद्र सरकारने या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला आहे. गृह मंत्रालयाने याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. यामुळे आता तपासाला गती मिळणार आहे.

आता एनआयए औपचारिकपणे या हल्ल्याचा तपास करणार आहे. एनआयएच्या पथकाने हल्ला झाल्यापासून पहलगाममध्ये तळ ठोकला आहे. आता केंद्र सरकारने अधिकृतपणे संपूर्ण तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. याबाबत एनआयए लवकरच या हल्ल्याच्या सर्व पैलूंचा सखोल तपास करेल.

यामध्ये हल्ल्याचा कट कोणी व कुठे रचला? यामध्ये सहभागी दहशतवादी संघटना, त्यांची भूमिका, स्लीपर सेलचा संभाव्य धोका याविषयीचा तपास करून लवकरच गृह मंत्रालयाला अहवाल सादर करेल. राष्ट्रीय तपास यंत्रणा स्थानिक पोलिसांकडून या हल्ल्याशी संबंधित आतापर्यंत मिळालेली माहिती, केस डायरी, एफआयआर आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

याबाबत सखोल तपास सुरू आहे. पहलगमामधील हल्ल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील नागरिकांच्या, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिणामी येथील सुरक्षेची जबाबदारी प्रमुख दहशतवादविरोधी संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. हल्ल्याचे गांभीर्य, नागरिकांची सुरक्षितता, मोठा दहशतवादी कट व आगामी धोके लक्षात घेता गृह मंत्रालयाने या हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवला आहे.

दरम्यान, या हल्ल्याचा तपास करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे हे संरक्षण यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे. तसेच तपास यंत्रणांना त्यांची कार्यक्षमता सिद्ध करावी लागेल. पहलगामधील हा हल्ला भारतातील सुरक्षा यंत्रणांपुढील मोठे आव्हान आहे. संरक्षण यंत्रणा व गुप्तचर विभागाच्या सर्व सीमा पार करत दहशतवाद्यांनी पहलगाममधील बैसरन येथे घुसून पर्यटकांवर हल्ला केला.

दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक मारले गेले. या हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. या घटनेवर देशभरातून संताप व्यक्त केला असून याबाबत पाकिस्तानसोबत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. याबाबत सध्या चौकशीसाठी अनेकांना ताब्यात घेतले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!