Uddhav Thackeray : ब्रेकिंग! निकालाच्या एक दिवस आधी राज्यात मोठ्या घडामोडी, उद्धव ठाकरेंवर कारवाईचे आदेश, नेमकं कारण काय?

Uddhav Thackeray : लोकसभेचा निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार असून त्यामुळे राजकीय नेते आणि मतदारांचे लक्ष आता एक्झिट पोल्ससह निवडणुकीच्या अधिकृत निकालांकडे लागून आहे.
अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आचारसंहिता भंग केल्याच्या भाजपच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेत उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
भाजप नेते आशिष शेलारांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे कारस्थान असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला मतं मिळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जाणूनबूजून मतदानाला वेळ लावला जातोय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. Uddhav Thackeray
दरम्यान, भाजपच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला नेमकं त्यादिवशी पत्रकार परिषदेत काय झाले याची माहिती मागवली होती.
त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.