Uddhav Thackeray : अयोध्येत नरेंद्र मोदींच्या नव्हे तर ‘त्या’ व्यक्तींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व्हावी, उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी..


Uddhav Thackeray  : अयोध्येत श्रीराम मंदिराच्या २२ जानेवारीला उद्घाटन सोहळ्यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

राम मंदिर उभारणे हे माझ्या वडिलांचंही स्वप्न होते. आज मंदिर बांधलं जात आहे. हा माझ्यासोबतच लाखो लोकांसाठी आनंदाचा क्षण आहे. २२ जानेवारीला आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊ.

त्यानंतर संध्याकाळी गोदावरी नदीवर आम्ही आरती करू. यावेळी काळाराम मंदिरात पूजेसाठी आम्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि शंकराचार्य यांनाही आमंत्रित केले, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले आहे. Uddhav Thackeray

यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुद्द्यावरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टोला लगावला. भाजप या मुद्द्याचा राजकीय किंवा व्यावसायिक हेतूसाठी वापर करत आहे की नाही हे माहित नाही. पण मी देशभक्त आहे अंधभक्त नाही. राम मंदिरासाठी शिवसेनेचं योगदान सर्वांना माहिती आहे.

येत्या २२ जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी झालीच पाहिजे. पण देशांचे जे दिवाळं निघालं आहे त्याचं काय तेसुद्धा पाहा. यावर चाय पे चर्चा करा, ढोकळ्यावर चर्चा करा.. पण चर्चा करा असा, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. त्याप्रमाणे २२ तारखेला अयोध्येतील राम मंदिरात राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!