वीजेचा शॉक लागून शेतकरी पित्यासह दोन चिमुकल्यांचा अंत, जालन्यातील हृदयद्रावक घटना…

जालना : शेतकाम करत असताना विद्युत तारेचा स्पर्श होऊन पित्यासह दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ही हृदयद्रावक घटना जालना जिल्ह्यातून समोर आली आहे.
विनोद मस्के असे वडिलांचे नाव असून मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धा मस्के या दोन लहान्यांनाही आपला जीव गवमावा लागला आहे.
जालना तालुक्यातील वरुड गावात शेतकाम करत असताना वडिलांना विद्युत तारेचा जोरदार शॉक बसला. त्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. जालना जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली असून विजेचा धक्का लागल्याने बाप आणि दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
या घटनेत विनोद मस्के आणि त्यांचा मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धा मस्के यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांना तिघांनाही तात्काळ जालना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं.
सध्या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे वरुड गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.