मोठी बातमी! व्यावसायिकांना लाच मागणारा गवळी निघाला सत्तारांचा स्वीय सहायक, कृषिमंत्री अडचणीत..

अकोला : कृषिमंत्री अब्दुल सत्तार सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. यामुळे त्यांची चर्चा सध्या सुरू आहे. कृषी विभागाने अकोल्यामध्ये टाकलेल्या धाडीत समावेश असलेला आणि व्यावसायिकांना लाच मागणारा दीपक गवळी हा अब्दुल सत्तारांचा पीए असल्याचे पत्र समोर आले आहे.
सिंहगड रोडवर धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची हत्या, पुण्यात गुन्हेगारी वाढली..
शासकीय पत्रात गवळीचा सत्तारांचे स्वीय सहायक असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, या शासकीय पत्राने कृषिमत्र्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.
तरुणांना मोठी संधी! पुणे महापालिकेअंतर्गत ५८१ पदांसाठी भरती, जाणून घ्या..
असे असले तरी अब्दुल सत्तार यांनी हा दावा फेटाळला आहे. दीपक गवळी हा आपला पीए नाही, तर कृषी अधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आळंदीत आम्हाला एकांतात नेऊन मारलं, वारकऱ्यांचा आरोपाने उडाली खळबळ..
कृषी विभागाच्या कथित पदकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकात अधिकारी नसलेल्या अनेक खासगी व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये अब्दुल सत्तार यांचा स्वीय सहाय्यक दीपक गवळी याचा देखील समावेश असल्याचे उघड झाले आहे.
यामुळे आता विरोधी पक्ष हे प्रकरण लावून धरण्याची शक्यता आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस सध्या याबाबत तपास करत आहेत.