पहिली निवडणूक ते आजपर्यंत तब्बल 53 वर्षे शरद पवारांसोबत पीए म्हणून राहिलेले तुकाराम धुवाळी यांचे निधन, शरद पवारांनी व्यक्त केलं दुःख….


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला जवळचा सहकारी गमावला आहे. पहिली निवडणूक ते आजपर्यंत तब्बल 53 वर्षे शरद पवारांसोबत पीए म्हणून राहिलेले तुकाराम धुवाळी यांचे निधन झाले आहे. याबाबत शरद पवारांनी यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे.

याबाबत शरद पवार म्हणाले, मी १९७२ पासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्यापासून ज्यांनी माझ्या स्वीय सहाय्यकाची जबाबदारी स्वीकारली ती तुकाराम धुवाळी यांनी. आणि हि जबाबदारी त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहून सांभाळली.

अतिशय विश्वासू, प्रामाणिक व सचोटीने वागणारा, नीगर्वी तसंच सतत हसतमुख असणारा, प्रत्येक व्यक्तीशी आदरानं वागणारा, प्रत्येकाचं काम पूर्ण होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणारा, अशा निराळ्या सहकाऱ्याचं देहावसान झालं याचं मला अत्यंतिक दु:ख होतंय.

आपल्या कामाचा व्याप जसा वाढत जातो तेव्हा अशी काही माणसं जवळ असावी लागतात की ज्यांच्या सहकार्याने आपण निश्चिंतपणे वेगवेगळ्या प्रकारची कामं करु शकतो. त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते निश्चिंतपणे, प्रामाणिकपणे पार पाडतात.

त्यात आपल्याला मागे वळून पाहावं लागत नाही, अशातीलच धुवाळी होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबातील एक व्यक्ती गेल्याचं दु:ख होतंय. त्यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो. असं म्हणत शरद पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!