पुणेकरांनो आता विनाहेल्मेट प्रवास करणं महागात पडणार, आरटीओचा मोठा निर्णय
पुणे : देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. असे असताना आता पुण्यात देखील अपघातांची संख्या सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आक्रमक पावले उचलली आहेत.
आता विना हेल्मेट प्रवास दुचाकीवरुन प्रवास करणं प्रवाशांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण शहरातील बेशिस्त वाहनचालकांसह आरटीओकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबत आरटीओने आता सरकारी कर्मचाऱ्यांवरही कारवाई सुरू केली आहे.
आरटीओकडून राज्य आणि केंद्र सरकारच्या कार्यालयात दुचाकीवरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्याबाबत आवाहन केले होते. मात्र, याकडे सरकारी कर्मचाऱ्यांनी आरटीओने या आरटीओच्या आवाहनाकडे पाठ फिरवली.
यामुळे आता थेट कारवाई करण्यात येणार आहे. पुणे शहरातील अपघातांबाबत धक्कादायक बाब समोर आली होती. यात सर्वाधिक अपघात हे दुचाकीस्वार आणि पादचारी यांच्याशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे