पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजपासून बसणार डबल टोल…!

पुणे : पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी आजपासून एक मोठी बातमी समोर आली आहे. आता पुण्याहून मुंबई आणि मुंबईहून पुणे कोणत्याही मार्गाने जा, आजपासून वाढीव टोल द्यावा लागणार आहे. यामुळे जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, देशात सर्वाधिक टोल पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेचा आहे, त्यातही आता 1 एप्रिलापासून वाढ झाली. आता जुन्या महामार्गावरील टोल वाढवण्यात आला आहे.
यामुळे प्रवाशांना जास्त दर देऊन प्रवास करावा लागणार आहे. पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांना डबल झटका शासनाने दिला आहे. या विरोधात दाखल असलेल्या याचिकेवर 5 एप्रिल रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्याहून मुंबई आणि मुंबईहून पुणे कोणत्याही मार्गाने जा, आजपासून वाढीव टोल द्यावा लागणार आहे. प्रवाशांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे आता निर्णयात बदल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.