खळबळजनक! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी..

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या पोलीस नियंत्रण कक्षात आलेल्या एका कॉलने खळबळ उडवून दिली आहे. या कॉलमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

पोलिस नियंत्रण कक्षाच्या सीयूजी क्रमांकावर कॉल आला आणि हा फोन हेड कॉन्स्टेबलने घेतला होता. योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवले जाईल, असे कॉलरने कॉन्स्टेबलला सांगितले. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
त्यानंतर कॉन्स्टेबलने विचारले असता तुम्ही कुठून बोलत आहात? त्यावेळी कॉलरने लगेचच कॉल डिस्कनेक्ट केला होता. सुरक्षा मुख्यालयात तैनात हेड कॉन्स्टेबल उधम सिंग यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर एकच गोंधळ उडाला आहे. या प्रकरणी पोलीस आणि यंत्रणांनी या तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी चार पथके तैनात केली आहेत.

सव्र्हेलन्स सेलच्या मदतीने धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल ट्रेस करण्यात येत आहे. योगी यांना यापूर्वीही धमक्या आल्या असल्याने सध्या या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे.