राज्यात तुफान पावसाचा इशारा! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील २४ तास अतिशय महत्त्वाचे, जाणून घ्या…

पुणे : सध्या अनेक दिवसांपासून गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. महाराष्ट्रात पुढील २४ तासांत तुफान पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.

यामध्ये पुणे, मुंबई, कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मराठवाडा भागासाठी हवामान विभागाने तीव्र इशारे Red, Orange, Yellow Alert जारी केले आहेत. राजस्थानच्या मध्यभागीही चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यामुळे मान्सूनचा पाऊस अजून वेगाने खेचला जात आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा आणि कोकण किनारपट्टीवर येलो अलर्ट देण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाली आहे. त्यातून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे मान्सूनची तीव्रता वाढली असल्याचे सांगितले जात आहे. पुढील काही दिवसांत हा कमी दाबाचा पट्टा वायव्य दिशेने सरकून महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

आज विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट उर्वरित विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, नाशिक व उत्तर महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. गुजरात, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा या भागात सातत्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

तसेच तीन ते पाच सप्टेंबरदरम्यान कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ३ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.