पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव पोलो कारचा भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी


पुणे : पुण्यात पहाटेच्या सुमारास शहरातील कोरेगाव पार्क परिसरात बंडगार्डन मेट्रो स्टेशन जवळ भरधाव पोलो कारचा भीषण अपघात झाला आहे . या घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. याप्रकरणी पोलिस तपास सुरु असून ड्रिंक अँड ड्राइव्हचा प्रकार असल्याचा संशय आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात बंडगार्डन मेट्रो स्टेशन जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या काळ्या रंगाच्या फोक्सवॅगन पोलो कारचा भीषण अपघात झाला. हा अपघात आज पहाटे ५:१० च्या सुमारास झाला. ही कार एवढ्या वेगात होती की चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटून बाजूला असलेल्या एका बस स्टॉपवर आदळली. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कदायक म्हणजे अपघात झालेल्या गाडीच्या डिक्कीमध्ये पोलिसांना दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.

या अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नवे ऋतिक भंडारे आणि यश भंडारे अशी आहेत. या घटनेचा पोलीस सविस्तर तपास करत असून या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. पोलिसांना असा संशय आहे की, या तरुणांनी दारू पिऊन गाडी चालवल्याने हा अपघात झाला असावा. असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!