मोठी बातमी! नीट परीक्षा रद्द झाल्याने तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या, देशभरात खळबळ, जबाबदार कोण?

मुंबई : वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेचा NEET Exam पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याने मोठी खळबळ माजली. नंतर ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बराच गोंधळ झाला नंतर आरोप प्रत्यारोप झाले. या पेपर फुटी प्रकरणाती मुख्य मा्सटरमाईंडलाही अटक झाली. नंतर परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली.

आता 21 जून रोजी देशभरात नीट परीक्षा पार पडणार आहे. मात्र या पेपर फुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला अून तो सहन न झाल्याने देशातील विविध भागत 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. यामुळे मोठी खळबळ उडाली असून याबाबत आता सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
दिल्लीतील आदर्श नगर भागातील नीटची परीक्षा दिलेल्या एका 21 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तिला या परीक्षेत चांगले गुण मिळण्याची अपेक्षा होती, मात्र परीक्षाच रद्द झाल्याने तिला मोठा धक्का बसला होता. राजस्थानच्या सिकर मधील एका 22 वर्षीय विद्यार्थ्यानेही आपलं आयुष्य संपवल्याचं उघड झालं. त्याने यापूर्वी 2 वेळा ही परीक्षा दिली होती, मात्र यंदा परीक्षेत उत्तम गुण मिळतील असा विश्वास त्याला होता.

पण पेपर फुटीनंतर परीक्षा रद्द करण्यात आली, याचा त्याला मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यातूनच त्याने हे पाऊल उचललं असावं असा संशय व्यक्त होत आहे. महत्त्वपूर्ण परीक्षेचा पेपर फुटल्याने ही परीक्षाच त्यानंतर रद्द करण्यात आली. त्यामुळे अनेक विद्यार्थी निराश झाले, काहींना प्रचंड तणाव आला आणि त्यापायीच काहींनी आपलं अनमोल जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयला सर्वात मोठं यश मिळालं. नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टमाइंड असलेल्या पी. व्ही.कुलकर्णी याला अटक सीबीआयने अटक केली. कुलकर्णी हाच नीट पेपर लीक प्रकरणातील मास्टमाइंड आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पीव्ही कुलकर्णी हा पुण्यात केमिस्ट्री लेक्चरर होता. तो नीट परीक्षा 2026 शी संबंधित होता.
या प्रकरणात आरोपी असलेल्या मनीषा वाघमारेला 14 मे रोजीच सीबीआयने अटक केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे संपूर्ण देशभरात पसरले आहेत. या प्रकरणात आता सीबीआयकडून सखोल चौकशी सुरू आहे. यामुळे येणाऱ्या काळात देखील अशा घटना घडणार नाहीत याबाबत सरकारने मोठे निर्णय घेणे गरजेचे आहे.