धक्कादायक! शिरुर येथे शेतीच्या वादातुन तिघांना मारहाण, सात जणांविरोधात गुन्हा दाखल..

शिरूर : कडवळ तोडण्याच्या एका महिलेसह तिच्या पती व नातलगावर लोखंडी गज व लाकडी काठ्यांनी हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात ही घटना उघडकीस आली आहे.
लोखंडी गज व लाकडी काठ्यांनी हल्ला करण्यात आला. या घटनेत तिघेजण जखमी झाले असून सात आरोपींविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी साधना शंकर देशमुख (वय ३६) रा. न्हावरे, ता. शिरुर, जि. पुणे) या दि ०३ जून २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास पती शंकर देशमुख व भावजय यशश्री हिंगे यांच्यासह शेत गट नं. २६४ मधून तोडलेले कडवळ मोटारसायकलवरुन नेत होत्या.
त्याचवेळी गावच्या हद्दीत न्हावरे ते चिंचणी रोडवर आरोपींनी संगनमत करुन मोटारसायकल अडवून “हे आमच्या बापाच्या रानातील कडवळ आहेत, तुम्ही कसे काय तोडताय” असे म्हणत अचानक हल्ला केला.
या हल्ल्यात लोखंडी गज, लाकडी काठ्या व लाथाबुक्क्यांनी फिर्यादीसह त्यांच्या वडिलांना त्रिंबक दादाभाऊ हिंगे आणि पती शंकर देशमुख यांना गंभीर दुखापत केली. फिर्यादीच्या पतीचे दोन दात पडले असून दोघांच्या हाताला चावाही घेतल्याची माहिती आहे. तसेच आरोपींनी “पुन्हा आमच्या रानात आलात तर जीवंत सोडणार नाही” अशी धमकी देत साधना शंकर देशमुख, त्रिंबक दादाभाऊ हिंगे, शंकर देशमुख यांना मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत.
तसेच याबाबत साधना देशमुख यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असुन मंदा हनुमंत देशमुख, कांचन महेश देशमुख, रुपाली हनुमंत देशमुख, प्रियंका जगदाळे, महेश हनुमंत देशमुख, तुकाराम जयवंत देशमुख, हनुमंत जयवंत देशमुख (सर्व रा. न्हावरे, निंबाळकरवस्ती, ता. शिरुर, जि. पुणे) या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास सहाय्यक फौजदार शिवाजी बनकर हे करत आहेत.