राजकारणात मोठी खळबळ! भुजबळांसह अजितदादांनाही जीवे मारण्याची धमकी, पोलीस यंत्रणा सावध…


पुणे : फक्त छगन भुजबळच नाही तर, अजित पवार ,धनंजय मुंडे यांनाही जीवे मारण्याचा धमक्या दिल्या होत्या. अशी धक्कदायक माहिती छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर भुजबळ यांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. भुजबळ यांना धमकी देणाऱ्याची पोलिसांनी कसून चौकशी केली.

त्यावेळी धक्कादायक खुलासा आरोपीने केला आहे. आरोपीने पोलिसांच्या चौकशीत दिलेल्या माहितीनुसार फक्त छगन भुजबळच नाही तर आणखी काही बड्या नेते रडारवर होते. अजित पवार ,धनंजय मुंडे यांनाही जीवे मारण्याचा धमक्या दिल्या होत्या.

दरम्यान, मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर फोन करुन ही धमकी देण्यात आली होती.

धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलं आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं नाव प्रशांत पाटील असून, तो कोल्हापूरच्या चंदगड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!