छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपी अटकेत..


पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळांना फोनवरून जीवे मारण्याची देण्यात आली आहे.

धमकी देणाऱ्यानं छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचे सांगितले. दरम्यान, धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीनं मद्यधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

छगन भुजबळ काल पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीनं मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचे सांगितले.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःचं नाव प्रशांत पाटील असल्याचे सांगितले . त्यानंतर छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून पुणे पोलिसांना तात्काळ या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली.

पोलिसांनी सर्व तपशी घेऊन तपास सुरू केला. त्यानंतर मोबाईल नंबरच्या आधारे प्रशांत पाटील या व्यक्तीला महाडमधून पुणे पोलीसांनी अटक केली आहे. मद्यधुंद अवस्थेत प्रशांत पाटीलनं मंत्री छगन भुजबळांना धमकी दिल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितलं. आरोपी प्रशांत पाटील मूळचा कोल्हापूरचा आहे.

दरम्यान, सोमवारी मंत्री छगन भुजबळ पुण्याला एका कार्यक्रमासाठी गेले होते. संध्याकाळचा कार्यक्रम सुरू असताना त्यांना धमकीचा फोन आला. खरंतर हा फोन छगन भुजबळांच्या मोबाईलवरच करण्यात आला होता.

त्यांचा मोबाईल त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या फोनवर डायवर्ट करण्यात आलेला होता. भुजबळ कार्यक्रमात असल्यामुळे तो फोन त्यांचा कार्यकर्त्या संतोष गायकवाड यांनी उचलला.

तुम्हाला मारायची मला सुपारी मिळाली आहे, सांगून काम करतो म्हणून तुम्हाला सांगितलं, असं धमकी देणाऱ्यानं सांगितलं. तसेच, पुढे बोलताना उद्या तुम्हाला मारणार असल्याचंही धमकी देणारा फोनोवर म्हणाला.

सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पुणे पोलिसांनी प्रकरणाची सर्व माहिती घेऊन चौकशी सुरू केली. संशयितचा शोध सुरू करण्यात आला. अ

खेर धमकी देणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी महाडमध्ये बेड्या ठोकल्या. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आज छगन भुजबळ पुण्याहून मुंबईला रवाना होणार आहेत.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!