देशभरात विविध एटीएम मधून पैसे चोरणाऱ्यांना इंदापूर पोलिसांनी पंजाबमधून ठोकल्या बेड्या..


इंदापूर : इंदापूर बस स्थानकाजवळील एटीएमसह देशभरातील विविध एटीएम मधून चोरी करणाऱ्या चोरट्यांना इंदापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पंजाब येथून दोघांना अटक केली. या कामगिरीने इंदापूर पोलिसांचे कौतुक होत आहे.

रचपल बलदेव सिंह (वय ३६, वर्षे रा. भतींडा पंजाब), लखवीर बलदेव सिंह (वय २९ वर्षे, रा.भतींडा पंजाब) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांचे नावे आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, इंदापूर बस स्थानकापरिसरात असलेल्या टाटा इंडीकॅश एटीएम मधून ८ जुन ते १२ जुन या दरम्यान १७ लाख ५५ हजार रूपये चोरीस गेल्याचा इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथकास मार्गदर्शक करीत तपासाबाबत सुचना दिल्या होत्या मात्र सदर चोरी झालेल्या टाटा इंडिकेश एटीएम मधील सीसीटिव्ही कॅमेरे बंद असल्याने एटीएम मशीन येथे सिक्युरिटी गार्ड नसल्याने तसेच चोरी झालेल्याची निश्चीत तारीख, वेळ माहिती नसल्याने तपासामध्ये अडचणी येत होत्या.

मात्र गुन्हे शोध पथकाने इंदापूर शहरासह, दौंड, शिक्रापूर, रांजणगाव उरुळी कांचन या परिसरातील अनेक सीसीटिव्ही कॅमेरे तपासात तांत्रिक माहितीच्या आधारे रचपल सिंह व लखवीर सिंह यांना अटक केली.

दरम्यान, या मधील सदर गुन्हयातील अटक आरोपी रचपल सिंह हा पूर्वी बँकेत नोकरी करत होता. त्यामुळे त्यांना एटीएम मशीन बाबत माहिती होती.

आरोपी यांनी इंदापूर येथील एटीएम मशीन खोलून त्यामध्ये पैसे भरण्याची कॅसेट जवळ स्पाय कॅमेरा बसवून एटीएम मशीनचा पासवर्ड स्पाय कॅमेराच्या रेकॉडींग मधून बघून त्यानंतर एटीएम मशीन उघडून त्यातील सर्व १७ लाख ५५ हजार रुपये चोरी केले होते. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!