कुरुलकरच्या लॅपटॉपमधे ‘ते’ फोटो आढळले, २००० पानी आरोपपत्र दाखल…


पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणात शुक्रवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं.

सुमारे दोन हजार पानांचे हे आरोपपत्र असून कुरुलकरची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणी घेण्याच्या मागणीवर सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवादही यावेळी पूर्ण झाला.

याची पुढील सुनावणी सात जुलै रोजी होणार असून, याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर त्यांच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह आणि धक्कादायक डेटा सापडल्याचं या आरोपपत्रात म्हटलं आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, डीआरडीओचे संचालक असताना प्रदीप कुरुलकर हे झारा दासगुप्ता या महिलेशी मोबाईल वॉट्सअप आणि ईमेलच्या माध्यमातून संपर्कात होता. झारा दासगुप्ता या नावाने बनावट अकाऊंट पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणांकडून चालवण्यात येत होतं. कुरुलकरांनी झारा दासगुप्ताला भारताच्या क्षेपणास्त्र मोहिमेबद्दल संवेदनशील माहिती दिली.

कुरुलकर भारताच्या डीआरडीओच्या वेगवेगळ्या लॅबोरेटरीजची माहिती देखील पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणाना देत होता. ज्या कालावधीत कुरुलकर झारा दासगुप्ताच्या संपर्कात होता त्याच कालावधीत तो सातवेळा विशेष पासपोर्टवर परदेशात जाऊन आला आहे. कुरुलकर झारा दास गुप्ताला संवेदनशील माहिती जशी देत होता त्याचबरोबर तिच्याशी अश्लील भाषेत चॅटिंग देखील करत होता.

झारा दासगुप्ता आणि कुरुलकर हे नग्न होऊन एकमेकांशी चॅटिंग करत होते आणि त्याचे फोटो कुरुलकरच्या लॅपटॉपमधे आढळून आले आहेत. प्रदीप कुरुलकर यांनी डी आर डी ओची आणखी कोणती संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिलीय याचा तपास ATS कडून सुरुच राहणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!