यंदा बारावीत पैकीच्या पैकी कोणालाच नाही, १ हजार ९२९ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के, जाणून घ्या….


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. यामध्ये मुलीनींच बाजी मारली. मागील वर्षापेक्षा यंदा कमी निकाल लागला आहे. तसेच यंदाच्या निकालात शंभर टक्के कोणालाही मिळवता आले नाही.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होण्याची मंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. यंदा मंडळाने बारावीच्या परीक्षाही लवकर घेतल्या होत्या. यामुळे निकाल देखील लवकरच लागला. असे असताना आता पुढील प्रवेश देखील लवकरच सुरु होतील, असेही सांगितले जात आहे.

या निकालात शंभर पैकी शंभर गुण मिळवणारा एकही विद्यार्थी नाही. परंतु शंभर टक्के निकाल लागलेली अनेक महाविद्यालये आहेत. राज्यातील १ हजार ९२९ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच ९० ते ९९.९९ टक्के निकाल लागलेली महाविद्यालये ४ हजार ५६५ आहेत. याबाबत शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे.

तसेच राज्यात १० हजार ४९६ कॉलेजातून विद्यार्थी बसले होते. त्यात शून्य टक्के निकाल लागलेली महाविद्यालये ३८ आहेत. यंदा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत कमी लागला आहे. निकाल वाढवण्याचे मोठं आव्हान मंडळापुढे आहे. विद्यार्थ्यांना आता पुढील तयारी करावी लागणार आहे. लवकरच ही प्रक्रिया सुरु होणार आहे.

दरम्यान, फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल ९३.३७% होता. फेब्रुवारी मार्च २०२५ चा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. निकालाचा टक्का १.४९ ने कमी झाला आहे. यंदा २० हजार ९४३ विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किंवा स्काऊट गाईडचे गुणे मिळाले आहेत. यंदा तृतीयपंथी १८ विद्यार्थी बसले होते. अशी देखील माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!