राज्यात पुन्हा पाऊस होणार सक्रिय ! सर्वदूर अतिमुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा असा आहे अंदाज ….


 पुणे : मागील एक आठवडा राज्यात पावसाने सुट्टी दिली होती. परंतु आता पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून राज्यात पाऊस सक्रीय झाला आहे. हवामान विभागाकडून आज दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या दक्षिण बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून उद्या म्हणजेच सोमवारपासून हे क्षेत्र आणखीच ठळक होणार आहे. परिणामी राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे.

आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र उन्हाचा चटका जाणवणार आहे.

 

हवामान खात्याने आज रविवारी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूरमध्ये पाऊस पडू शकतो. सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!