महिला सरपंचांच्या कृतीची झलक अशीही झाली सर्वांच्या चर्चेची! मतदार यादी ‘बीऐलो’ म्हणून आलेल्या शिक्षिकेने महिला सरपंचांवर कविता लिहूनच ऐकविली…

उरुळीकांचन : हवेली तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या उरुळीकांचन (ता.हवेली ) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच ऋतुजा कांचन ह्या आपल्या कृतीने सध्या सर्वाधिक चर्चेत आल्या आहेत. सरपंचपद हे शोभेचे पद नसून या पदातून नागरीकांच्या समस्या कश्या सोडविल्या जातात व हे पद जनतेच्या सुयी -सुविधेसाठी निर्माण केले गेले असल्याची जाणीवेतून आपल्या कृतीतून काम करण्याच्या भावनेतून सध्या ग्रामपंचायतीची जबाबदारी पेललेल्या या महिला सरपंच यांच्या कर्तृत्वाची चुणूक सध्या उरुळीकांचन व पंचक्रोशीत नागरीकांत आहे.

याच त्यांच्या कर्तव्याच्या जाणीवेची झलक ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या मतदारयादीच्या कामानिमित्त बिऐलो म्हणून येत असलेल्या एका शिक्षिकेने कथन केली असून या शिक्षिकेने त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा संदेशात व कविता लिहून आपली भावना व्यक्त करण्याचा प्रसंग घडला आहे.
पुणे जिल्ह्यात कायम प्रसिद्धीच्या चर्चेत असलेले गाव सध्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या कृतीने सर्वाधिक चर्चेत आले आहे.या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या खुर्चीची जबाबदारी स्विकारलेल्या महिला सरपंच ऋतुजा अजिंक्य कांचन या त्यांच्या कृतीने सध्या सर्वात चर्चेत आल्या आहेत. महिला सरपंच या पुरुषप्रधान सांस्कृतीत कसे ठळक काम करू शकते,असे मूर्तिमंत उदाहरण हे त्यांच्या कृतीतून पुढे आले आहे. साधे, सरळ ,निरागस कृतीतून सुरू केलेल काम आता ग्रामस्थांच्या चांगल्याच नजरेस कसे भरत आहे. याचे उदाहरण त्यांनी कामातून सोडले आहे.

सरपंच ऋतुजा कांचन यांनी कार्यालयातील तसेच ग्रामस्थ व इतर नागरिकांशी सुसंवादाने कामांची सोडवून केल्याची पध्दत नागरीकांना भारावीत आहे. सरपंचपदाचा पद्भार स्विकारल्यानंतर अवघ्या काही कालावधीत त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आदराच्या कृतीचा अणुभव आला. दस्तुरखुद्द शरद पवार यांनी खुर्चीचा महत्त्व उद्घाटन कार्यक्रमात दाखवून दिल्यानंतर सरपंच यांनीही आपल्या कृतीने कामकाज करण्याचा सुखद अनुभव देऊ केला आहे.

पहिल्यांदा स्वच्छता अभियाने परिसर सुंदर राखण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्राधान्य क्रमाने विकासकामांची पूर्तता तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांनी प्रलंबित प्रश्न, बांधकाम नोंदीचे अभियान ,वाहतुक कोंडी हे प्रश्न सोडवून त्यांनी सरपंच आपल्या दारी हे अभियान राबवून नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. या काळात गावात सुरू असलेल्या आरोग्य अभियान, शिक्षणाच्या सुविधा तसेच शासनाच्या मतदार यादी पडताळणी कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेऊन या कामाची पाहणी करुन घेतली आहे. या सर्व त्यांच्या कृतीचे एका शिक्षिका महिलेच्या निदर्शनास आल्याने त्यांनी त्यांची कृती कागदावर गिरवली असून त्यांच्या कार्याचे कौतुक संदेश व कवितेतून देऊ केला आहे.
शिक्षिका मनिषा कापरे यांनी लिहीलेला संदेश पुढीलप्रमाणे…
प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात वेगवेगळे पैलू असतात. प्रत्येक स्त्री विविध गुणांनी परिपूर्ण परिपूर असते. असाच अनुभव मला कामाच्या निमित्ताने ग्रामपंचायत, कायर्यालयात आला. ग्रामपंचायत म्हटले की सामान्य नागरिकास कार्यालयातून कशा प्रकारची प्रतिक्रिया मिळते हे महत्त्वाचे असते. आजच्या सरंपच ऋतुजाताई कांचन याच्याविषयी, पाच दिवसामध्ये खूप छान अनुभव आले. काम करण्याची उमेद, त्याच्या मध्ये असणारा लोकांबद्दलचा आदर, बोलण्याची पध्दत, स्वभावातील नम्रता असे अनेक गुण असणाऱ्या ताई.
प्रत्येक लहान मुलांना शाळेत आम्ही एक विषय दिला जातो. उदा. शिक्षक कसा असावा, विद्यार्थी कसा असावा, आई कशी असावी, मुलगा कसा असावा असे प्रश्न विचारले जातात. तसा आजच्या तंत्रयुगाच्या काळात, विकासाच्या युगात सरपंच कसा असावा तर त्रऋतुजा अंजिक्य कांचन यांच्यासारख्या एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यावर अनिल कपूर अभिनेत्याने सर्व काही निर्णय घेऊनेएका दिवसात बदल घडवून आणला होता.
तसा बदल सामान्य नागरिक या नात्याने मला या पाच दिवसामध्ये मला जाणवला. कित्येक काम करण्यासाठी शिपायांपासून अधिकारी सदस्य, पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन कामाची अमलबजावणी करणारा एक आदर्श सरपंच मला बी. एल. ओ च्या कामानिमित्ताने अनुभवास आला.
माणसाच्या बोलण्यात सालसपणा, आदर, काम करण्याची उमेद असेल तर काम करणाऱ्या व्यक्तीलाही कामाचा हुरूप येतो. त्या ओळखीच्या आहेत किंवा नातेवाईक आहेत असे नाही. त्या या उरुळीकांचन गावच्या आदर्श सरपंच आहेत. हे मला माहित आहे. ते माझ्या लेखातून मांडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला आहे. त्याच्याविषयी काही सुचलेल्या ओळी..
‘पुण्याची लक्ष्मी उरुळीत आली’
‘भोसल्याची लेक कांचनांची सून झाली’
‘प्रेमळ चेहरा, बोलके डोळे’
‘कामच त्याचे सर्वकाही बोले’
‘मूर्ती लहान किती महान’
‘गावकऱ्याची आहे शान ‘
‘शिवकन्येची वाघीण तू’
‘उरुळीकांचन गावची सरपंच तू’
‘ अंगी आहेत सरिच गुण’
‘आदर्श सरपंच म्हणून गातील गुण’
‘सुंदर देखणी सरपंच आमुची गुणी’
‘लाभो या गावी अखंड चरणी ‘
‘सास-याची स्वप्नपूर्ती सूनबाईनी केली पुरी’
‘उरुळीकांचन गावची स्वप्नपूर्ती ऋतुजानी केली पुरी’.
पुढील कार्यासाठी व सदैव सरपंच होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
सौ. मनिषा कापरे , उरुळीकांचन.