Theur : यशवंत सहकारी साखर करखान्याची प्राथमिक यादी तयार, निवडणूकीबाबतच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष…


Theur : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३- २४ ते २०२८- २९ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कारखानास्तरावरील मतदारांच्या प्राथमिक मतदार यादीचे काम पूर्ण झाले आहे. निवडणुकीच्या पुढील कार्यवाहीसाठी प्राथमिक मतदार यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा पुणे प्रादेशिक साखर सह संचालकांना देण्यात आले आहे. अशी माहिती कारखान्याच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष संजय गोंदे यांनी दिली आहे.

कारखान्याने संस्था सभासदांसाठीचे ठराव देण्यास २० ऑक्टोबरपासून सुरुवात केली होती आणि ते २१ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात आले. त्यानुसार मुदतीत २४६ संस्थांचे ठराव प्राप्त झालेले आहेत. दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या अर्हता दिनांकावर (कट ऑफ डेट) प्राथमिक मतदार यादीचे काम पूर्ण झाले आहे. Theur

मुंबई उच्च न्यायालयातील दाखल याचिका क्रमांक ४७६२ दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजीचा आदेश आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या ११ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रान्वये यशवंत कारखान्याच्या प्राथमिक मतदार यादीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार ऊस उत्पादक शेतकरी आणि संस्था सभासद मिळून एकूण २१ हजार ४१४ सभासदांचा प्राथमिक यादीत समावेश असल्याचे ते म्हणाले आहे.

निवडणुकीबाबत प्राधिकरणाच्या निर्णयाकडे लक्ष…

हवेली तालुक्यातील महत्त्वाच्या सहकारी संस्थांमध्ये थेऊरचा यशवंत सहकारी साखर कारखान्याचा समावेश होतो. आर्थिक अडचणीमुळे २०११-१२ पासून हा कारखाना बंद आहे. या कारखान्याचे अवसायन शासनाने रद्द केल्यानंतर प्रशासकीय समिती गठित करण्यात आली.

सभासदांच्या हाती कारखान्याचा कारभार देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असून, आता जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडून कारखाना स्तरावरील तयार झालेली प्राथमिक मतदार यादी निवडणूक प्राधिकरणाने जाणे अपेक्षित आहे.

त्यानंतर निवडणूक कार्यक्रमाबाबतचा निर्णय घोषित होणे अपेक्षित मानले जात आहे.त्यामुळे तब्बल दिड दशकानंतर या कारखान्याची निवडणूक आता रंगणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!