१ मार्चपासून ‘हे’ नियम बदलणार, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम? काय आहे घ्या जाणून..


मुंबई : दर महिन्याच्या एक तारखेला काहीना काही बदल होतात. त्यानुसार आता फेब्रुवारी महिना संपत आला असून मार्च महिना सुरू होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत.

नवीन महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे १ मार्चपासून अनेक नियम बदलणार आहेत. या नवीन नियमाचा तुमच्या खिशावर परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊयात की नेमके काय बदल होणार आहेत.

एफडीवरील व्याजदरात बदल

मार्च 2025 पासून बँकांनी एफडीवरील व्याजदरात काही बदल केले आहेत. व्याजदर वाढू किंवा कमी होऊ शकतात, आता बँका त्यांच्या तरलता आणि आर्थिक गरजांनुसार व्याजदरांमध्ये लवचिकता ठेवू शकतात. लहान गुंतवणूकदारांवर, विशेषत: ज्यांनी 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी FD केली आहे, त्यांच्यावर नवीन दरांचा परिणाम होऊ शकतो. लहान गुंतवणूकदारांवर परिणाम: नवीन दरांचा परिणाम 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी एफडी करणाऱ्यांवर होऊ शकतो.

मुदत ठेव

जर तुम्ही कष्टाने कमावलेले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी मुदत ठेव (FD) मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. मार्च 2025 पासून बँक एफडीच्या नियमांमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत. हे नवीन नियम केवळ तुमच्या परताव्यावर परिणाम करु शकत नाहीत तर कर आणि पैसे काढण्याच्या पद्धतींमध्येही फरक करु शकतात. त्यामुळं, जर तुम्ही भविष्यात FD करण्याचा विचार करत असाल तर हे बदल समजून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

एलपीजीची किंमत

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किंमतीचा आढावा घेतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला 1 मार्च 2025 च्या पहाटे सिलेंडरच्या किमतीत बदल दिसू शकतो. सुधारित किंमती सकाळी 6 वाजता जाहीर केल्या जाऊ शकतात.

सेबीने म्युच्युअल फंड फोलिओ आणि डिमॅट खात्यांच्या सुधारणेसाठी नवीन नियम

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने म्युच्युअल फंड फोलिओ आणि डिमॅट खात्यांसाठी नामांकन प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. 1 मार्च 2025 पासून लागू झालेले नवीन सुधारित नियम, विशेषतः गुंतवणूकदाराच्या आजारपण किंवा निधनाच्या बाबतीत, मालमत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तयार केलेले आहेत.

ATF आणि CNG-PNG दर

दर महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्या विमान इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन (ATF) आणि CNG-PNG च्या किमतीत देखील बदल करतात.आता या इंधनाच्या किंमतीत वाढ होणार की किंमती कमी होणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!