पुणे शहरात होणार दोन महापालिका? मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण….


पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात दोन महानगरपालिका होणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत हद्दीलगतच्या गावांच्या समावेशानंतर राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनलेल्या पुणे महापालिकेवरील प्रशासकीय ताण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत निर्णय होण्याची चर्चा सुरू होती.

असे असताना आता या पार्श्वभूमीवर आता आणखी उशीर न करता पुणे महापालिकेचे विभाजन करावेच लागेल, अशी स्पष्ट भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली. हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी पुण्यासह पिंपरी-चिंचवडचा विकास वेगाने होत असल्याने तेथेही वेगळी पालिकेची गरज असल्याचे सांगितले आहे.

पुण्याच्या पूर्व व पश्चिम बाजूस स्वतंत्र महापालिका कराव्यात, अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. पुणे महापालिकेच्या परिसरात प्रचंड वेगाने होणारे नागरीकरण पाहता व ३२ गावांच्या समावेशानंतर पालिका प्रशासनावरील वाढलेला ताण पाहता पुण्यासाठी आणखी एका महापालिकेची गरज आहे.

अनेक पुण्यासह अनेक शहरांमध्ये प्रशासकराज आहे. नगरसेवक नसल्याने नागरिकांची कामे अडत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात न्यायालयातील याचिकांचा निकाल जानेवारीत अपेक्षित आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल.

याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, मे महिन्याच्या आसपास आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रश्नांना न्याय देता येईल, तसेच ते म्हणाले, पुण्याची वाढ कोणी रोखू शकणार नाही. आत्ताच मोठ्या प्रमाणावर समस्या जाणवू लागल्या आहेत. २५ वर्षांनंतर काय परिस्थिती असेल, सांगता येत नाही.

यामुळे लवकरात लवकर पुणे शहराच्या पूर्व व पश्चिम बाजूंना नव्या महापालिका करणे आवश्यक आहे. त्यासाठीचा निर्णय आत्ताच घ्यावा लागेल,’ असे चेतन तुपे यांनी सांगितले. यामुळे येणाऱ्या महापालिका बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!