दुचाकीत पेट्रोल भरण्यास झाला उशीर, तिघांकडून पंप चालकास व कर्मचाऱ्यास बेदम मारहाण..


पुणे : दुचाकीत पेट्रोल भरण्यास उशीर झाल्यामुळे तीन जणांनी मिळून पेट्रोल पंपाच्या मालकास व कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगला थिएटरजवळ पंपावरुन उघडकीस आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेतले आहे.

सचिन शहा (पेट्रोल पंपाचे मालक) यांना बांबूने मारहाण करून जखमी केले आहे. याप्रकरणी नवनाथ कचरू काळे (वय २६) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरजितसिंग युवराजसिंग जुनी (वय २४), जयसिंग जलसिंग जुनी (वय १९, दोघे रा. पाटील इस्टेट) अशे शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महापालिका भवन परिसरातील मंगला थिएटरजवळ पंपावर पेट्रोल भरायला आले होते. पेट्रोल भरण्यास उशीर झाल्यावरून आरोपी आणि कामगारांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यावेळी दोघांनी कामगार नवनाथ काळे यांना मारहाण केली होती.

त्यानंतर पुन्हा अर्ध्या तासाने जुनी आणि त्याचे साथीदार पेट्रोल पंपावर आले होते. त्यांनी पेट्रोल पंपावरील कार्यालयाची तोडफोड केली. पेट्रोल पंपाचे मालक सचिन शहा यांना बांबूने मारहाण करून जखमी केले आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त वसंत कुंवर यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहायक निरीक्षक बाजीराव नाईक, सविता सपकाळे, उपनिरीक्षक अजित बडे, पोलिस कर्मचारी रूपेश वाघमारे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!